Vasant More

Vasant More : वसंत मोरेंचं ठरलं ! पुणे लोकसभेत ‘एकला चलो रे’ चा नारा?

401 0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली. वसंत मोरे यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट करून आपला राजीनामा दिला दिला होता. राज ठाकरेंच्या फोटो समोर ते उभे आहेत, त्यांनी हात जोडले आहेत साहेब मला माफ करा असं वसंत मोरे म्हणत आहेत आणि त्यांनी आपण मनसे सोडल्याचं जाहीर केलं होते. यानंतर वसंत तात्या कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

वसंत मोरेंचा ‘एकला चलो रे’ चा नारा?
मनसे सोडल्यानंतर वसंत मोरे यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये राष्ट्रवादीचे पक्षाचे सर्वेसेवा शरद पवार, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचीदेखील वसंत मोरे यांनी भेट घेतली.

या भेटीमध्ये त्यांनी सगळ्या नेत्यांकडे आपला प्रस्ताव मांडला पण या नेत्यांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. वसंत मोरे हे लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे कुठेतरी वसंत मोरे यांनी एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. जर वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम राहिले तर पुण्यात मुरलीधर मोहळ (भाजप), काँग्रेस आणि अपक्ष म्हणून वसंत मोरे अशी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sonam Wangchuck : सोनम वांगचुक यांचं पुन्हा एकदा आमरण उपोषण

Gold Rate : सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!