Varunraj Bhide Journalism Award: ‘महाराष्ट्र टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांना आश्वासक पत्रकार पुरस्कार
Varunraj Bhide Journalism Award: पुणे : ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. 28 एप्रिल रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुरस्काराचे वितरण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. (Varunraj Bhide Journalism Award)
माता न तू वैरीणी… मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करत आईनेच बॉयफ्रेंडशी ठेवायला लावले संबंध
वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार यंदा ‘लोकमत’चे विशेष वार्ताहर यदु जोशी यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच ‘महाराष्ट्र टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांना आश्वासक पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
‘एबीपी माझा’चे पुणे प्रतिनिधी मिकी घई यांना इलेक्ट्रॉनिक माध्यम पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ‘लोकसत्ता’चे सांगली प्रतिनिधी दिंगबर शिंदे यांना ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह मुख्य पुरस्कार म्हणून दिले जाणार आहे. तर आश्वासक पत्रकार पुरस्कार म्हणून १० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह दिले जाते. वरुणराज भिडे पुरस्काराचे हे २३ वे वर्ष आहे.
