VAISHNAVI HAGWANE UPDATE वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं राज्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपींची नवनवीन प्रकरण समोर येत आहेत.
त्यापैकी अनेक प्रकरण ही जुनी आहेत. जुन्या प्रकरणांमध्ये आत्ता पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, मात्र जेव्हा ही प्रकरणं घडली होती VAISHNAVI HAGWANE UPDATE
तेव्हाच पोलिसांनी अपेक्षित कारवाई का केली नाही ? आणि पोलिसांना आत्ताच जाग का येत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय.
16 मे रोजी भुकूम परिसरात वास्तव्यास असलेल्या वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली.
त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, नणंद करिष्मा आणि दीर सुशील हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्यावेळी संपूर्ण हगवणे कुटुंब पोलीस कोठडीची हवा खात होतं त्यावेळी वैष्णवी यांचं नऊ महिन्यांचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे देण्यात आलं.
त्याने तीन-चार दिवस या बाळाची हेळसांड केली, वैष्णवी चे कुटुंबीय बाळ मागण्यासाठी गेले त्यावेळी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना हाकलून देण्यात आलं.
त्या प्रकरणी निलेश चव्हाण वरही गुन्हे दाखल करण्यात आले.
वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हे नातेवाईक असल्याने त्यांच्या नावाचा वापर करत कस्पटे कुटुंबीयांना धमकावलं.
त्यामुळे या प्रकरणात जालिंदर सुपेकर या नावाची ही एन्ट्री झाली.
त्यामुळे आत्तापर्यंत या प्रकरणात शशांक, राजेंद्र, लता, करिष्मा, सुशील, निलेश आणि जालिंदर सुपेकर हे महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपासून सुरू झालेल्या या प्रकरणात आता सर्व संशय आरोपींची अनेक जुनी प्रकरणं बाहेर येत आहेत.
शशांक आणि सुशील या दोन्ही भावांनी खोटे भाडेकरार दाखवून पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळवले.
त्या प्रकरणात आता चौकशी सुरू झाली आहे.