Undri Gas Cylinder Explosion: उंड्रीमधील जगदंब भवन मार्गावरील मार्वल आयडियल सोसायटीच्या बाराव्या मजल्यावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास (Undri Gas Cylinder Explosion) गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागून संपूर्ण मजल्यावर एकच खळबळ उडाली. आगीत १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.
अग्निशमन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जखमींमध्ये दोन अग्निशमन कर्मचारी आणि तीन सामान्य नागरिकांचा (Undri Gas Cylinder Explosion) समावेश आहे. सर्व जखमींवर तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर असल्याचेही सूत्रांकडून समजते.
स्फोटानंतर आग झपाट्याने पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ दाखल (Undri Gas Cylinder Explosion) झाल्या. जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करत काही रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, सध्या कूलिंगचे काम सुरू आहे.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन विभाग संयुक्तपणे तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षितता उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.