PUNE DP ROAD SLAB COLLAPSED: पुण्यात स्लॅब कोसळून दोन जखमी; अग्निशमन दलाकडून रेस्क्यु ऑपरेशन

42 0

आज दिनांक १९•११•२०२५ रोजी दुपारी ०१•०५ वाजता ढोले पाटील रस्ता येथे रूबी हॉस्पिटल जवळ एका हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरु असताना स्लॅब कोसळून दोन इसम अडकल्याची वर्दि मिळताच दलाकडून तातडीने नायडू व कसबा अग्निशमन केंद्र आणि मुख्यालयातील एक रेस्क्यु व्हॅन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दलाकडील स्प्रेडर, कटर, एअर लिफ्टिंग बॅग इत्यादी रेस्क्यू उपकरणे वापरत व स्लॅब बाजूला करीत अडकलेल्या दोन इसमांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून तत्परतेने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून समजले. सचिन चव्हाण (येरवडा) व कृष्णा (येरवडा) अशी जखमींची नावे आहेत.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, प्रभाकर उम्राटकर, प्रशांत गायकर तसेच वाहन चालक राजू ओव्हाळ, अनिकेत ओव्हाळ, आकाश दुबळे व तांडेल भाऊसाहेब चोरमले,संदीप रणदिवे आणि फायरमन भालचंद्र गव्हाणकर गणेश मोरे, अल्पेश कोंडे, नवनाथ शेडगे, गणेश लोणारे, सुरेश पवार, प्रतीक कुंभार, मयूर चव्हाण यांनी सहभाग घेतला.

“अग्निशमन दलाचे जवानांनी वेळेत आणि रेस्क्यू टुल्स वापरत केलेल्या कामगिरीने अडकलेल्या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. यावेळी पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग उपायुक्त व बांधकाम विभाग कर्मचारी तसेच ढोले पाटील क्षेञिय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस दलाचे सहकार्य मिळाले.”

Share This News
error: Content is protected !!