Pune Police Transfer : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली
पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची (Pune Police Transfer) गृहखात्याकडून (महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य) पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार हे 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारला होता.
पुणे ग्रामीण पोलीस आयुक्त अंकित गोयल यांचीदेखील बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी पंकज देशमुख नवे पुणे ग्रामीण पोलीस आयुक्त असणार आहेत. अंकित गोयल यांना पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
