पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली

658 0

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे आयुक्त सुहास दिवसे यांची राज्य शासनाने गुरुवारी बदली केली आहे.त्यांच्या जागी राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त राहुल महिवाल यांची नियुक्ती केली आहे.

विद्यमान आयुक्त सुहास दिवसे यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेली नाही. महिवाल हे महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून पुण्यात काम पाहत होते. ते 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 2005 मध्ये युपीएसएसीच्या नागरी सेवा परीक्षेत देशात प्रथम आले होते.

दिवसे यांच्या कारकिर्दीत हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम मार्गी लागले. तसेच त्यांच्याच काळात विकास आराखडाही अंतिम टप्प्यात आला.

Share This News
error: Content is protected !!