वाहतूक पोलीस बनला देवदूत ! पुण्यात अपघातग्रस्त चिमुरडीला खांद्यावर उचलून नेत हॉस्पिटलमध्ये केलं दाखल..

463 0

पुण्यातील वारजे पुलावर घडलेल्या विचित्र अपघाताची सीसीटीव्ही फुटेज समोर आली देवदूत बनून आलेल्या वाहतूक पोलिसानं कारमध्ये अडकून पडलेल्या चिमुरडीला स्वतःच्या खांद्यावर उचलून नेत कसं हॉस्पिटल गाठलं 14 एप्रिल रोजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी वारजे पुलावर हा अपघात घडला. अपघातामुळं मुंबई-पुणे महामार्गावरील वारजे भागातील पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. आंबेगावच्या दिशेनं निघालेल्या कोथरूडमधील पुराणिक कुटुंबीयाच्या कारला एका ट्रकनं मागून जोरदार धडक दिली.

या धडकेमुळं त्यांची कार दोन वाहनांमध्ये चिरडली गेली. मनोज पुराणिक, पत्नी आणि त्यांच्या दोन मुली जखमी अवस्थेत कारमध्ये अडकून पडल्या होत्या. वाहतूककोंडीमुळं घटनास्थळी रुग्णवाहिका वेळेवर पोचणं अशक्य झालं होतं. वारजे वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी पोचले खरे पण गर्दीच इतकी होती की त्यांना देखील हालचाल करणं अशक्य बनलं होतं याच दरम्यान, घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेले पोलीस नाईक समीर बागसिराज यांची दृष्टी कारमध्ये अडकून पडलेल्या एका चिमुरडीवर पडली. तिच्या नाकाला, डोक्याला जबर मार लागला होता आणि तिच्या जखमेतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. मग मात्र समीर बागसिराज यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तिला आपल्या खांद्यावर घेतली आणि हॉस्पिटलच्या दिशेनं धावायला सुरुवात केली. याच दरम्यान, त्यांच्या मदतीला रामदास नवले हे रिक्षाचालक धावून आले आणि अखेर त्या चिमुरडीला वेळेत उपचार मिळू शकले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!