कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

6623 0

पुणे दि.१७-कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

या कालावधीत सदर रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून सातान्याकडे जाणारी वाहतूक ही नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्याची साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.

Share This News

Related Post

PUNE CRIME : नायजेरियन पती-पत्नीकडून कोट्यावधी रुपयांचे कोकेन जप्त ; अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा 1 ची मोठी कारवाई

Posted by - July 26, 2022 0
पुणे : मंगळवारी अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा 1 मधील पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नालंदा गार्डन रेसिडेन्सी…

‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची अधिसूचना जारी, एक एप्रिलपासून लागू सुधारित दर

Posted by - March 26, 2022 0
मुंबई- इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात…
Pune Acsident

पुण्यातील भोरमध्ये भरधाव पिकअप टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात; 7 मजूर जखमी

Posted by - June 17, 2023 0
पुणे : पुण्याच्या भोरमधील नेकलेस पॉईंटजवळ भरधाव पिकअप टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील 7 मजूर जखमी…
Zika Virus

Zika Virus : पुण्यानंतर पंढरपुरात सापडला झिकाचा रुग्ण; मुंबईवरून परतताच पडला होता आजारी

Posted by - November 17, 2023 0
सोलापूर : पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. 23 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी एकादशीसाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.…

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Posted by - August 13, 2022 0
दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जयराम रमेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *