इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये चोरीचं सत्र सुरूच आहे. नुकतच भिगवणमध्ये तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याचं प्रकरण समोर आलंय. सोने रोख रक्कम दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे. भिगवणमध्ये तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये आठ लाख 36 हजार रुपयांचे सोने, रोख रक्कम आणि एक दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले आहेत. घरफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा सोनं रोख रक्कम लंपास केली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला हे चार अज्ञात चोरटे दिसून येत आहेत. चोरटे गेटवरून चढताना आणि पुन्हा उतरताना सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्ट दिसून आलंय. घरफोडीच्या या घटनेबाबत इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. इंदापूर तालुक्यात चोऱ्यांचं प्रमाण अधिक वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
