ताम्हिणी घाटात दरड कोसळली; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

522 0

मुळशी धरण भागातील घाट माथ्यावर सुरु असलेल्या जोरदार. अतिवृष्टी सदृष्य पावसामुळे गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या दरम्यान पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर आदरवाडी येथे दरड कोसळुन रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरड कोसळून दगड माती वाहून रस्त्याबरोबरच जवळच असलेल्या हॉटेल दरडी खाली गाडले गेल्याने एकाचा मृत्यु झाला. तर एक जण जखमी झाला. रस्ता वाहतुकीसाठी सुरु करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु केले आहेत. मुळशी धरण भागात गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस झाला असून ताम्हिणी येथे चोवीस तासांत ५५६ मिमी. पाऊस झाला आहे.

या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी झाडे पडणे, रस्ता बंद होणे असे प्रकार घडल्याचे दिसून येत आहेत. या अतिवृष्टीमुळे आदरवाडी येथे रात्री २.३० वाजता डोंगराचा एक पुर्ण भाग खाली कोसळला. डोंगर माथा ते रस्ता सुमारे ५०० मीटर रस्त्यापर्यंत दगड, माती, खराळ वाहून रस्ता व जवळच्या ‘पिकनिक हॉटेल’ वर पडल्याने हॉटेल दरडी खाली गाडले गेले. दरड कोसळल्याच्या आवाजाने शेजारच्या हॉटेल मधील ग्रामस्थांनी ‘पिकनिक हॉटेल’ मधील दबलेल्या दोघांना बाहेर काढले. परंतू त्यातील शिवाजी मोतीराम बहिरट, वय-३०, हा तरुण मृत्युमुखी पडल्याचे आधलुन आले तर एक जण जखमी झाला असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान या घटनेमुळे ताम्हिणी-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने प्रशासनाने दरड हटवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. वाहतुक सुरळीत होण्यासाठी ५ ते 7 तास लागण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!