प्रभाग क्रमांक २४ च्या निवडणुकीची धुरा युवा चेहऱ्याच्या खांद्यावर, योगेश जगताप भाजपाचे निवडणूक प्रमुख

40 0

पुणे: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. यानंतर आता प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. प्रभाग क्रमांक 24 (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – के. एम. हॉस्पिटल) भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रमुखपदी युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष योगेश जगताप यांची निवड करण्यात आली आहे. शहराचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या हस्ते जगताप यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपाकडून माजी सभागृह नेते गणेश बिडकर, देवेंद्र वडके, उज्वला गणेश यादव, कल्पना दिलीप बहिरट निवडणुकीच्या मैदानात आहेत. गणेश बिडकर यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या या पॅनलच्या निवडणूक नियोजनाची धुरा योगेश जगताप यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “राष्ट्र प्रथम आणि विकासाचा अजेंडा घेऊन भारतीय जनता पक्ष पुणे शहरामध्ये महापालिका निवडणूक लढवत आहे. शहराच्या विकासासाठी गतकाळामध्ये अनेक पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 24 मध्ये आजवर अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील या भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्याचे ध्येय आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक नक्कीच भाजपाच्या मागे ठामपणे उभे राहतील, हा विश्वास आहे”.

Share This News
error: Content is protected !!