मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करावा आणि नंतर मेळावा घ्यावा

224 0

पुणे: राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्ता नाट्यानंतर अखेर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर तब्बल 39 दिवसांनी शिंदे फडणवीस सरकारचा विस्तार झाला आणि 18 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि नुकत्याच पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत

त्यानंतर आता दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

माननीय मुख्यमंत्र्यांनी आता दसरा मेळाव्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करावा आणि नंतर मेळावा घ्यावा.असं अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!