Crime

वाकड येथे पोलिसांच्या अंगावर आरोपीनं सोडलं कुत्रं ! गांजा विक्रीप्रकरणी कारवाई दरम्यान घडली घटना

202 0

पिंपरी-चिंचवड शहरात गांजा विक्री करणाऱ्या तडीपार आरोपीस पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर, आरोपींनी चक्क पाळीव कुत्रा सोडून हल्ला चढवला. या घटनेत पोलीस नाईक संदीप पाटील कुत्र्यानं चावा घेतल्यानं जखमी झाले.

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मातोबा नगर परिसरातील तुळजाभवानी स्क्रॅप सेंटर समोर ही धक्कादायक घटना घडली. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी रवींद्र प्रकाश घाडगे या तडीपार आरोपीला पकडण्यास गेले असता घाडगे याच्याकडं 20 हजार 250 रुपये किमतीचा 810 ग्रॅम गांजा, 1700 रुपये, 20 हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा एक मोबाइल असा एकूण 41 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यावेळी अमली पदार्थ विरोधी पथक पोलिसांनी आरोपीला गांजा कुठून आणला असं विचारलं असता त्यानं त्याचा भाऊ सागर प्रकाश घाडगे याच्याकडून गांजा विकत आणल्याचं सांगितलं. त्याच दरम्यान तिथं सागर घाडगे आला आणि त्यानं पोलिसांना दमदाटी करायला सुरूवात केली. ‘मी एकालाही सोडणार नाही……. तुम्हाला बघून घेतो……..! असं म्हणत त्यानं त्याच्या ताब्यात असलेल्या कुत्र्याला पोलिसांच्या दिशेने सोडलं… त्यात पोलीस नाईक संदीप पाटील यांना कुत्र्यानं चावा घेतल्यामुळं ते किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तडीपार आरोपी रवींद्र प्रकाश घाडगे याला अटक केली असून सागर घाडगे आणि अशोक तुपेरे या दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचं वाकड पोलिसांनी सांगितलं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!