लेह ते मानली हा 430 किलोमीटरचा सायकल प्रवास 55 तासात पूर्ण

156 0

 

पुण्यातील तिने चक्क लेह ते मनाली असा तब्बल 430 किलोमीटरचा सायकल प्रवास 55 तासात पूर्ण करत जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून असा विक्रम करणारी ही पहिली महिला ठरली आहे.

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या प्रीती म्हस्के हिने भारतात आपली ओळख निर्माण केली आहे. 2017 पासून सायकलिंग करणाऱ्या प्रीती यांनी अनेक पदकं जिंकली आहेत. गृहिणी ते सायकलस्वार हा प्रवास खडतर तर होता मात्र अशक्य नव्हता त्यामुळे प्रीती यांनी नेहेमी स्वतःवर आत्मविश्वास ठेवत आपला छंद जोपासला. सायकलिंग करण्याची संधी मिळत गेली आणि त्या संधीचे सोने करण्यात मी यशस्वी ठरत गेलं.

वयाच्या 45 व्या वर्षी प्रीती यांनी सायकल चालून अनेक आजारांवर मात केली, आजारांशी झुंजत असताना आरोग्य स्वस्थ राहावं म्हणून सायकलिंग करणं पर्याय निवडला आणि याच पर्यायाने त्यांना अनेक क्षेत्रात संधी दिली. आरोग्य सुदृढ झालेच त्यासोबत त्यांनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला. प्रीती यांना घरच्यांची नेहेमी साथ मिळाली. लेह ते मानली प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता पण प्रीती यांनी हिम्मत दाखवत हा प्रवास ठरलेल्या वेळेत पूर्ण करून दाखवला आणि अवघ्या भरताचं मन जिंकलं.

किती ही संकटं आली आणि काहीही झालं तरी हार न मनन्याचा निर्णय ठाम ठेवा नक्कीच यश मिळेल असं प्रीती यांनी सांगितलं. ऊन, वारा, पाऊस सगळं झेलत प्रीतीने छंदातून आपली ओळख निर्माण केली.

Share This News
error: Content is protected !!