पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला असून दोन प्रचंड मोठे गट आमनेसामने आले आहेत. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
यवतमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी गावातील महिला आणि लहाण मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे.