GANESH NAIK : मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा

752 0

GANESH NAIK: मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा

निधी व त्याकरिता प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी, तसेच कृत्रीम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर

व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात, बिबट नसबंदीबाबत केंद्राची मान्यता प्राप्त झाली

असून त्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक (GANESH NAIK) यांनी दिल्या.

फडणवीसांसमोर गणेश नाईकांनी सगळंच काढलं

वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या सभागृहात मानव-बिबट संघर्ष उपाययोजनांबाबत आयोजित

बैठकीत ते बोलत होते. सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मल्लिकार्जुन,

मुख्य वनसंरक्षक, नाशिक, आशिष ठाकरे, वनसंरक्षक पुणे वनवृत्त महादेव मोहिते, उपवनसंरक्षक पुणे, प्रशांत खाडे,

उपवनसंरक्षक जुन्नर, श्रीधर्मबीर सालचिठठल, उपवनसंरक्षक अहिल्यानगर, विवेक होशिंग, उपवनसंरक्षक वन्यजीव

जयरामगौडा, उपवनसंरक्षक शिक्षण कुलराज सिंह, उपवनसंरक्षक सोलापूर सिध्देश सावडेकर उपवनसंरक्षक नाशिक,

पंकज गर्ग उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण यांच्यासह वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ECI | LOCAL BODY ELECTION: निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न

नाईक यांनी नाशिक मधील वनकर्मचारी यांच्यावर झालेल्या बिबट हल्लाप्रकरणी संबंधित

वनकर्मचारी यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. मानव-बिबट संघर्षाबाबत वनकर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत,

त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य पुरविण्यात यावे. जिल्हा योजनेमधून आकस्मिक निधी त्वरीत उपलब्ध करुन देण्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

बांबू लागवड करुन बिबटला अटकाव करता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करावा , अशा सूचना  दिल्या.

Chhath Puja in Pune and Pimpri-Chinchwad: पुण्यात छठ पूजेचा उत्साह; छठ पूजेसाठी ३० हून अधिक ठिकाणी भव्य आयोजन

Share This News
error: Content is protected !!