पुणे विभागातल्या तीन एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन

412 0

सार्वजानिक बसेसमध्ये अपघात होण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या काही महिन्यात चालकाकडून अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. पुणे विभागात अचानक मद्यपान तपासणी मोहिम राबवली. त्यात पिऊन आढळलेल्या तीन एसटी चालकांना निलंबित केलं, तर तीन जणांची चौकशी लावली आहे. पुणे विभागात स्वारगेट शिवाजीनगर आगारात ही कारवाई सुरू आहे.मद्यपान तपासणी मोहिम अंतर्गत कोणत्याही प्रकारची अघटीत घटना घडू नये म्हणून एसटी महामंडळाने सर्व चालक व वाहक ड्युटीवर असल्यावर त्यांची ब्रेथ एनालायझरद्वारे तपासणी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे विभागातील स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारासह जिल्ह्यातील सर्व आगारातील चालक आणि वाहकांची ही तपासणी करण्यात आली. त्यावेळी 6 चालकांनी मद्यपान केल्याचे निदर्शनात आले आहे. ब्रेथ एनलायझरद्वारे तपासणी केली. त्यात मद्यपान केलेले तीन चालक आढळून आले. त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे, तर 3 जणांची चौकशी सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!