crime

पिंपरी-चिंचवड शहरात दोन चिमुकल्यांवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला

578 0

भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असतानाच पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळतीय भटक्या कुत्र्याने दोन चिमुकल्या मुलावर जीवघेणा हल्ला केला असून. या हल्ल्यात श्रीजित काकडे आणि गणेश गायकवाड हे दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.

भोसरी भागातील लांडगे वस्ती या ठिकाणी भोसरी परिसरात ही मुलं सायंकाळी खेळत असताना त्याच्यावर एका भटक्या कुत्र्यांनं जीवघेणा हल्ला केला. या भटक्या कुत्र्यानं श्रीजीत काकडे आणि गणेश गायकवाड या दोन मुलांच्या चेहऱ्याला चावा घेतला . कुत्र्याच्या हल्ल्यात ही दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली असून, या दुर्घटनेमुळं पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय

Share This News
error: Content is protected !!