आपल्या वक्तव्यातून वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी – अजित पवार

363 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत .जातीय, धार्मिक सलोखा आपल्याला कायम ठेवायचा आहे. आपल्या वक्तव्यातून तेढ निर्माण होईल, वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे.

अजित पवार आज महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात शिवाजी नगर येथे आले होते तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

कोणतीही सभा घेताना पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. औरंगाबादेतल्या सभेला पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. त्याचे पालन संबंधितांनी करावे. म्हणजे वातावरण चांगले राहील असं वक्तव्य अजित पवार यांनी केल आहे.

राज्यात तलवारींचा साठा सापडला आहे. त्याची माहिती पोलीस खाते घेत आहे. विद्ध्वंस घडवण्याचा काहींचा प्रयत्न असावा. त्या आत्ताच का सापडत आहेत, त्याचा मास्टरमाइंड कोण, याचा शोध सुरू आहे. पोलीस दल सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवून आहे. तलवारीचा साठा सापडला त्यावर पोलीस जप्तीची कारवाई करत आहेत”, असं देखील अजित पवार  म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide