पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

386 0

पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा चेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी नऊच्या सुमारास घडली. दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. गाडी फलाटावर आल्यावर प्रचंड गर्दी होती. डब्यात चढताना एकजण खाली पडला गर्दी त्याला तुडवत पुढे गेल्याने त्या प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला.

दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. अशा स्थितीत गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री पुणे दानापूर एक्सप्रेसला प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीतून गाडीमध्ये चढत असताना प्रवासी खाली पडला आणि इतर प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत तो गंभीर जखमी झाला, त्याला रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी तात्काळ उपचारासाठी लोहमार्ग पोलिसांकडे सोपविला. मात्र यावेळी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

Share This News
error: Content is protected !!