संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आपलं आयुष्य संपवल्याने सर्व स्तरातूनच हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरीष महाराज आपल्या आई, वडील, बहिण, मित्रपरिवार आणि होणाऱ्या पत्नीसाठी जगाचा निरोप घेण्याआधी भाऊक करणारी काही पत्र लिहून ठेवली. आयुष्यात कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो. मी ही थांबतोय. यात सर्वस्वी दोष माझाच आहे असं म्हणत शिरीष महाराजांनी आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे..काही दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता. आणि आता काही दिवसांवरच लग्न होतं. पण त्या आधीच आर्थिक कारणातून महाराजांनी टोकाचा निर्णय घेतला. कर्ज फेडण्यासाठी मदत करण्याची विनंती आपल्या मित्रांना महाराजांनी शेवटच्या पत्रातून केली आहे. आयुष्याची लढाई अशी अर्ध्यावरच सोडून गेल्याने महाराजांचा असा हा निर्णय अनेकांच्या मनाला चटका लावून गेलाय.
