भीमा कोरेगावमध्ये दंगे व्हावे अशी काहींची इच्छा – चंद्रकांत पाटील

207 0

पुणे: आज 205 वा शौर्य दिन साजरा करण्यात येत असून शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी सकाळपासून मोठी गर्दी केली.

याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निर्णय घेतला असून ते घरातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत या संदर्भातील एक पत्र चंद्रकांत पाटील यांनी समाज माध्यमातून प्रसिद्ध केले

काही दिवसांपूर्वी शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी चंद्रकांत पाटील शाईफेक करण्यात आली होती

पाटील यांना पुन्हा एकदा भीमा कोरेगाव येथील काही जणांनी शाई फेकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ते जाणार नाहीत याबद्दल पाटील यांनी माहिती दिली ते म्हणाले की, “भीमा कोरेगाव येथील काही जणांनी शाई फेकण्याचा इशारा दिला आहे, मात्र मी असल्या भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही मात्र लाखो अनुयायी भीमा कोरेगाव येथे आल्याने अशा चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावे, दंगे व्हावे अशी काही जणांची इच्छा आहे, त्यामुळे मी माझ्या घरीच आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून विजय स्तंभाला मानवंदना देणार आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मनसुबा मी पूर्ण होऊ देणार नाही असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!