sonali aandekar & pratibha dhangekar

धंगेकरांना धक्का! जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर विजयी

55 0

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आंदेकर विरुद्ध धंगेकर या लढतीत अखेर आंदेकर गटाने बाजी मारली आहे. गुंड बंडू आंदेकर यांची सून सोनाली आंदेकर (SONALI AANDEKAR)यांनी जेलमधून निवडणूक लढवत विजयी झाल्या आहेत.या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे नेते आमदार रवींद्र धंगेकर(RAVINDRA DHANGEKAR) यांच्या पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर (PRATIBHA DHANGEKAR)यांचा पराभव झाला आहे.

या प्रभागातील मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पहिल्या फेरीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, चौथ्या फेरीअखेर सोनाली आंदेकर यांनी ८५६ मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखण्यात त्यांना यश आले आणि त्यांनी धंगेकर यांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला.

सोनाली आंदेकर(SONALI AANDEKAR) या सध्या तुरुंगात आहेत. आयुष कोमकर(AAYUSH KOMKAR) हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल असून, पोलिसांनी त्यांना अटक केली होती. कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांनी ही निवडणूक तुरुंगातूनच लढवली होती. तुरुंगात असूनही त्यांनी मिळवलेला हा विजय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. तर आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!