Shivneri Bus

Shivneri Bus : शिवनेरी बस उद्यापासून ‘अटल सेतू’ वरुन धावणार

698 0

मुंबई : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या “अटल सेतू “वरून एसटीची शिवनेरी बस (Shivneri Bus) सुरू करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक 20 फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय(सकाळी 6.30) व स्वारगेट- दादर (7.00) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत.

या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परत 11 वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे 1 तास वाचणार आहे. तिकीट दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरी प्रवाशांनी शिवनेरी बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

NCP : …तोपर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ नाव कायम राहणार; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय टोळीकडून साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त

Pune Crime Video : पुण्यातील खराडी परिसरात टोळक्याकडून गाड्यांच्या जाळपोळीसह महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Hemant Godse Car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात

Pune News : शिवनेरीच्या पायथ्याजवळ लावण्यात आलेले पीएम मोदी, सीएम शिंदेंचे पोस्टर फाडले; 5 जणांना अटक

Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती वर्षातून 2 वेळा का साजरी होते?

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!