ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना “ब्राह्मण भूषण” पुरस्कार जाहीर

533 0

पुणे- आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिक व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका मासिक या दोन्ही नियतकालिकांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी ज्वलंत अभिमान असणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना यावर्षीचा ब्राह्मण भूषण पुरस्कार जाहीर झाला असून युवा लेखक, सिनेदिग्ग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्काराचे यंदाचे 8 वे वर्ष आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम 8 मे रोजी सायं. साडेपाच वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवसंघ प्रतिष्ठानचे संस्थापक कॅप्टन निलेश गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून तर बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मासिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

या कार्यक्रमात रद पोंक्षे लिखित मी आणि नथुराम या पुस्तकाच्या 10 व्या आवृत्तीचे लोकार्पण होणार असून त्यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ घेणार आहेत.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!