पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यात वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलेला आरोपी पळून (Sharad Mohol Murder) गेल्याची घटना समोर आली होती. यामुळे पुणे पोलिसांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. मार्शल लुईस लिलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला सायबर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, तसेच त्याच्यावर कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकी दिल्याचा आरोप देखील होता. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
काय घडले नेमके?
आरोपी मार्शल लुईस लिलाकर याचा पोलिसांकडून शोध सुरू होता.आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी नेरळ व कर्जत येथे तपास पथके रवाना केली होती. दरम्यान आरोपी हा येरवडा येथील त्याच्या मावशीच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला. तेथे अगोदरपासूनच तैनात असलेल्या सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
आता त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मार्शल लुईस लिलाकर पळून गेल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.