गँगस्टर शरद मोहोळ टोळीचा म्हाळुंगे मधील राधा चौकात राडा (व्हिडिओ)

886 0

पुणे- पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात पुन्हा एकदा व्यावसायिक वर्चस्ववादातून टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. जानेवारी महिन्यात घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्यामध्ये शरद मोहोळ याच्या टोळक्याने म्हाळुंगे इथल्या राधा चौकात राडा घालत असल्याचे दिसून येत आहे.

व्यावसायिक वादातून पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली या कारणावरून शरद मोहोळच्या साथीदारांनी विठ्ठल शेलारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शेलार पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र मोहोळच्या साथीदारांनी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर दगडफेक केली तसेच कुंड्या फेकून दहशत माजवली. ही घटना ८ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती. हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत टोळके तिथून पसार झाले होते. या प्रकरणी एक महिन्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार ?

शरद मोहोळ

-पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून मोहोळची ओळख

– सरपंचाचं अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी शरद मोहोळ याला अटक केली होती.

– मोहोळ व आलोक भालेरावला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं

– त्यावेळी त्यांनी दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता

– या खटल्यातून त्यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली

विठ्ठल शेलार

-विठ्ठल शेलार मुळशी तालुक्यातील गुंड

– शेलार विरुद्ध खून, अपहरण, दरोड्याची तयारी आदी गुन्हे दाखल

– शेलार विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे

Share This News

Related Post

Nagpur Accident

Nagpur Accident : CA परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच वैष्णवीचा दुर्दैवी अंत; Video आला समोर

Posted by - July 20, 2023 0
नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. या अपघातात (Nagpur Accident) काही जण…

धर्माबाबत असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको – शरद पवार

Posted by - April 25, 2022 0
राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकापर्यंत कुणीही जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या…
Death Video

Death Video : जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 17, 2023 0
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घटना घडली आहे. यामध्ये ट्रेडमिलवर धावत असताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी…

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

Posted by - May 14, 2022 0
पुणे- भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या…
Poster

Poster : राज आणि उद्धव एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंड करून विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *