ASHISH SHELAR: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू करणार

43 0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने व्यंगचित्र अध्यासन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री एँड. आशिष शेलार यांनी पुणे येथे केली.

मंत्री आशिष शेलार हे आज पुणे दौऱ्यावर असून वयाची शंभरी पूर्ण केलेल्या व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांची त्यांनी निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ पत्रांचे पुस्तक त्यांना शासनाच्या वतीने भेट देऊन त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या व्यंगचित्राची शैली व 100 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, यावेळी सोबत असलेले राजेश पांडे यांनी पुणेकरांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये व्यंगचित्र अध्यासन केंद्र असावे आणि त्याला शि.द. फडणीस यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. त्यावर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी तातडीने राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत चर्चा केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याला तातडीने मान्यता देऊन आजच शी.द.फडणीस यांच्या घरूनच ही घोषणा करा, असे सूचित केले. त्यानुसार आज आशिष शेलार यांनी या अध्यासनाची घोषणा केली.

Share This News
error: Content is protected !!