पुण्यात ससून रुग्णालयात पैसे द्या आणि मिळवा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र

532 0

पुणे- पुण्यातील ससून रुग्णालयात पैसे देऊन बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आता या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी ससून रुग्णालयाने आता त्रिसदस्य चौकशी समिती नेमली आहे.

मागील काही दिवसांपासून दिव्यांग प्रमाणपत्राचा काळाबाजार होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे. आतापर्यंत किती जणांना अशाप्रकारचे खोटे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, रुग्णालयातील किती जणांचा यात सहभाग आहे, याची पडताळणी ही चौकशी समिती करणार आहे. ज्यांना हे खोटे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, त्यांनी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतला, याचाही तपास ही चौकशी समिती करणार आहे.

Share This News
error: Content is protected !!