pune police

Pune Police: खळबळजनक! पुणे पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

628 7

पुणे : पुणे पोलीस (Pune Police) दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या मध्ये रात्री ड्युटीवर असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहेनगर चौकीच्या वरती असलेल्या रेस्टरूममध्ये या पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. आज सकाळच्या दरम्यान हि घटना उघडकीस आली.

या पोलीस कर्मचारचे नाव भारत दत्ता आस्मर आहे. त्यांनी CR Mobile 1 वरील कार्बाईनने चार राउंड फायर करून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ता घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!