घरगुती गॅसचे दर वाढताच रूपाली पाटील ट्विट करून म्हणाल्या… BJPहटाओ देश बचाओ

1163 0

पुणे- एकीकडे दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात आज पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा अनेक राजकीय नेत्यांकडून निषेध करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील ट्वीट करत भाजपसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, महागाईचा भोंगा वाजला 50 रुपयाने गॅस वाढला. चूल सोडून गॅस वापरा म्हणणारे, गॅसमध्येच भरमसाठ वाढ झाली. परत चुलीकडे जावेच लागणार, पोटाचा प्रश्न आहे ना. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र BJPहटाओ देश बचाओ असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!