प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

40 0

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते होणार शनिवारी (दि. ७) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे., त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात आणि जंगी मिरवणूक देखील निघणार आहे.

मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गणेश चतुर्थीला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात होईल. सुरवातिला लाठीकाठी मर्दानी खेळ व शंखनाद होईल. त्यांनतर सात पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नु म वी, कलावंत, श्रीराम ही सात ढोल ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी असणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे. विशेष म्हणजे १३२ वर्षानंतर प्रथमच यावर्षी बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत. दुपारी साडेबारा वाजताच्या मुहर्तावर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रम होतील असे पुनीत बालन यांनी सांगितले.

Share This News

Related Post

कल्याणीनगर मध्ये पुन्हा हिट अँड रन; कारचा धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू 

Posted by - July 21, 2024 0
पोर्शे कार अपघातानंतर हादरून गेलेले कल्याणी नगर पुन्हा एकदा हिट अँड रन अपघातामुळे चर्चेत आले आहे. कल्याणी नगर मध्ये काल…

पुणे:शुक्रवार पेठेतील जीर्ण झालेल्या वाड्याची पडधड;६ रहिवाशांची सुखरुप सुटका

Posted by - July 9, 2022 0
पुणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 478 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे.शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अनेक जुनाट वाडे आहेत.पावसाळ्यामध्ये…
Accident News

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 18, 2023 0
अहमदनगर : पुण्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

ईडी ची टायपिंग मिस्टेक ; 5 चे केले 55 लाख

Posted by - March 4, 2022 0
मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक…

संतापलेल्या टेलरनं ग्राहकाच्या पोटात खुपसली कात्री

Posted by - March 19, 2022 0
टेलर आणि त्याच्या ग्राहकात घडलेल्या एका घटनेनं पुणे हादरुन गेलंय. या घटनेत संतापलेल्या टेलरनं चक्क ग्राहकाच्या पोटातच कात्री खुपसली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *