डीक्कीच्या पुणे अध्यक्षपदी उद्योजक राजेंद्र साळवे यांची निवड

173 0

पुणे- दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( डीक्की) च्या नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय मेळाव्यात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र साळवे यांची पुणे अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. डीक्की चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे व राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार नररा यांच्या हस्ते राजेंद्र साळवे यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली.

साळवे हे गेल्या 10 वर्षा पासून दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. पुणे, पिंपरी – चिंचवड व नवी मुंबई जवाहरलाल नेहरू पोर्ट बंदर परिसरात ते एक आदर्श आणि प्रसिध्द उद्योजक म्हणून परिचित आहेत .व्यवसायाबरोबरच ते सामाजिक क्षेत्रात ही अग्रेसर आहेत. डीक्की च्या माध्यमातून नवे उद्योजक घडवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात त्यातही साळवे यांनी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले आहे .त्यामुळेच त्यांना आता अतिशय महत्त्वाच्या अशा पुणे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे .

यावेळी राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्यात काही फेरबदल करून नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.सध्याचे पुणे अध्यक्ष अनिल होवाळे यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!