RAJENDRA HAGWANE & SUSHIL HAGWANE पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. तब्बल 7 दिवस फरार असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर अटक झाली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. काय आहे हे प्रकरण? आणि या फरार आरोपींना पोलिसांनी नेमकं कसं पकडलं? RAJENDRA HAGWANE & SUSHIL HAGWANE
SANGEETA TIWARI ON RUPALI CHAKANKAR | मयुरी हगवणेच्या तक्रारीची महिला आयोगानं दखल का घेतली नाही?
“वैष्णवी हगवणे… एक शिक्षित, आत्मनिर्भर मुलगी. प्रेमात पडली… शंशाक हगवणेशी घरच्यांच्या विरोधात तिने लग्न केलं.. लग्नात वैष्णवीच्या कुटुंबाने तब्बल 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी भेट वस्तू म्हणून दिल्या… एवढं सारं देऊनही वैष्णवीचा तिचा सासरच्या मंडळींनी छळ सुरूच ठेवला.. वैष्णवीने केलेल्या प्रेमाचे रूपांतर प्रेमाचं रुपांतर छळात झालं. या संपूर्ण मानसिक आणि शारीरिक त्रासास कंटाळून वैष्णवीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी वैष्णवीवर पती शंशाक, सासू लता, नणंद करिश्मा आणि घरच्या इतरांनी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला, असा आरोप केला. या विरोधात त्यांनी 17 मे रोजी पोलिसात फिर्याद दिली आणि या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीच्या पती शशांक, सासू लता, ननंद करिष्मा यांना अटक केली.
VAISHNAVI HAGWANE FULL STORY: एफआयआर दाखल होण्यापासून ते आरोपींच्या अटकेपर्यंतची संपूर्ण स्टोरी
मात्र या प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते..गुरुवारी मावळ तालुक्यातील तळेगाव येथे एका हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये ते दिसले. फरार सासरे राजेंद्र हगवणे मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरुन सुशील निघून गेला. पोलिसांना ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली… संपूर्ण परिसरात झडती घेतली. अखेर शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
Rajendra&Sushil Hagawane Arrest: फरार सासरा आणि दिराला पोलिसांकडून अटक
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यासह महाराष्ट्रभरात मोठी संतापाची लाट आहे. या प्रकरणांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातलं होतं.. बारामती झालेल्या सभेत त्यांनी फरार आरोपींना अटक होणार असल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर पोलिसांची पथके देखील वाढवण्यात आली होती..तळेगावमध्ये, जिथे राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना पाहिलं गेलं होतं… इथूनच त्यांच्या हालचाली पोलिसांनी ट्रॅक करून त्यांना पिंपरी चिंचवडमधून अटक केली… या प्रकरणात मृत वैष्णवीचे नातेवाईक संतप्त आहेत.. ‘उशीर झाला, पण अटक झाली. आता आमच्या मुलीस न्याय मिळाला पाहिजे. या लोकांना मोक्का लावून फाशी दिली पाहिजे अशी मागणी वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी केली..वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर उघड झालेला हा सारा प्रकार महिलांवरील अत्याचाराचं एक भयावह रूप आहे… पोलिसांनी अटक केली असली, तरी आता या आरोपींवर न्यायालयीन प्रक्रिया कशी पार पडते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे