राज ठाकरे ‘या’ दिवशी करणार अयोध्या दौरा

431 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून आज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या पाच जूनला हजारो कार्यकर्त्यांसह अयोध्येत जाणार असल्याची मोठी घोषणा केली.

अनेक दिवसांपासून राज ठाकरे आयोध्या दौरा कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता पाच जूनला राज ठाकरे आयोध्येला जाणार आहेत.

त्याचबरोबर मशिदींवरील  भोंगे उतरवण्यासाठी तीन मेपर्यंत दिलेल्या अल्टिमेटम वर राज ठाकरे ठाम असल्याचं पाहायला मिळाला त्याच बरोबर महाराष्ट्र दिनी औरंगाबाद या ठिकाणी सभा घेणार असल्याचे देखील राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले

 

 

Share This News
error: Content is protected !!