पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार; धरण क्षेत्रात पाऊस परतला, कोणत्या धरणात किती पाणीसाठा ? वाचा सविस्तर

263 0

पुणेकरांची पावसाची चिंता मिटणार; धरण क्षेत्रात पाऊस परतला, कोणत्या धरणात किती पाणीसाठा ? वाचा सविस्तर

जून महिन्यात 20-25 दिवस पावसाने दांडी मारल्यामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. पुणेकरांना केवळ एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असतानाच आता गेल्या आठवड्याभरात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.

पुण्यातील घाटमाथ्यांवर काही दिवसांपूर्वी रेड अलर्ट देण्यात आला होता तर येत्या सोमवार पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती त्यानुसार अनेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. धरण क्षेत्रात देखील पाऊस झाल्याने खडकवासला धरण साखळी प्रकल्पात पाणीसाठा वाढू लागला आहे. शुक्रवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पानशेत वरसगाव 23 मिमी, 23 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 34 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आता खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांचा पाणीसाठा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 8 टीएमसी झाला आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणात 1 टीएमसी, टेमघर धरणात 0.71 टीएमसी, पानशेत धरणात 3.64 टीएमसी तर वरसगाव धरणात 2.65 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!