शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहूल पोकळे राष्ट्रवादीत; अजित पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश

267 0

पुणे: शेतकरी कामगार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष राहूल पोकळे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

राष्ट्रसेवा समूह या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य सर्वांना परिचित आहे. सामुदायिक विवाह, 300 गावात संविधान जनजागृती यात्रा, प्रबोधन शिबिरे इत्यादी अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. महिला बचत गटांचे विस्तृत जाळे, युवकांचे असलेले संघटन, राज्यभरात असलेले काम, संघटनाचा राष्ट्रवादीला फायदा होईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने पक्ष संघटन त्यांचा कसा उपयोग करून घेते हे पहावे लागेल. मागील 2 निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून झालेला निसटता पराभव हा अनेकांनी दखल घ्यावा असा होता. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राहुल पोकळे यांचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!