नाकाला जीभ लावणारे पुणेरी काका ! तब्बल 90 मिनिटं नाकाला लावून ठेवली जीभ… व्हिडीओ व्हायरल

1363 0

तुमची जीभ तुमच्या नाकाला लागते का ? नाही ना ! पण पुण्यातल्या एका अवलियाची जीभ त्याच्या नाकाला लागते बरं का ! कसबा पेठेतील शिंपी आळीत राहणाऱ्या या अवलियाचं नाव आहे सोपान नारायण भूमकर. परिसरात काका या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या काकांचं वय आहे 75 वर्षे ! तब्बल 90 मिनिटं म्हणजे दीड तास नाकाला जीभ लावण्याची करामत या काकांनी करून दाखवलीये आणि त्याचा व्हिडिओ त्यांचे पुत्र हर्षल भूमकर यांनी चित्रित केला असून तो सध्या व्हायरल होतोय

Share This News
error: Content is protected !!