पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पुणे शहरात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’चं आयोजन करण्यात आलं आहे. ही टूर 19 ते 24 जानेवारी दरम्यान होणार असून त्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आलेले असून वाहतूक वळवण्यात आली आहे. काही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या दिवशी कोणत्या रस्त्यांवरील वाहतूक कुठे वळवली आहे ? आणि कोणत्या रस्त्यांवर जाणं तुम्ही टाळलं पाहिजे पाहूया..
वाहतुकीतील हे बदल 19 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लागू असतील. त्या वेळेत एफसी रोड, युनिव्हर्सिटी रोड, जेएम रोड आणि या रस्त्यांना जोडणारे इतर रस्ते बंद असणार आहेत. खंडूजी बाबा चौक ते गुडलक चौक, गुडलक चौकाकडे जाणारा गरवारे पूल, गुडलक चौक ते चाफेकर चौक, चाफेकर चौक ते रेंज हिल्स कॉर्नर, रेंज हिल्स कॉर्नर ते संचेती चौक, संचेती हॉस्पिटल ते डेक्कन जिमखाना मार्गांवर जाणं टाळा. त्याऐवजी स्वारगेट/ कोथरुड ते पुणे विद्यापीठ /शिवाजी नगर परिसरातून वाहतुकीसाठी अलका चौक, एसबी रोड किंवा भिडे पुलाचा वापर करा. पुणे विद्यापीठ/खडकी ते डेक्कन जाण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करा. तसेच संगमवाडी किंवा रेंज हिल्स आणि खडकीमार्गेही जाता येऊ शकतं. दरम्यान या कालावधीत एफसीरोड आणि जेएम रस्त्याने जाणारी वाहने एसबी रोड, प्रभात रोड आणि रिव्हरसाईड रोडमार्गे वळवली जातील. याविषयीची सविस्तर माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.