पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित सायकल स्पर्धेला प्रतिसाद

270 0

पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज सिंहगड येथे फोर्ट सायक्लॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सिंहगड घाट रस्त्याने ९ किमी अंतर व १ तासाचा कालावधी असलेल्या सायकल स्पर्धेमध्ये ५३ सायकल स्पर्धक सहभागी झाले होते.

१८ वर्षावरील वयोगटासाठी आणि पर्यटकांना फिटनेसचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेला वनविभागाच्या टोल नाक्यापासून प्रारंभ झाला आणि सिंहगड किल्ल्याच्या वाहनतळ येथे स्पर्धेचा समारोप झाला.

नेहा टिकम, प्रीती मस्के, किरीट कोकजे, चैतन्य वेल्हाळ या सायकलिंगच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. पुरुष गटात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विठ्ठल भोसले यांनी ३३ मिनिटांत स्पर्धेची अंतिम रेषा पार केली. त्याचबरोबर व्दितीय क्रमांक भरत भोसले ४३ मिनिटे व तृतीय क्रमांक कमल तिलानीने ४६ मिनिटांत सायकल स्पर्धा पुर्ण केली. महिला गटात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सई गायकवाड यांनी १ तास ०२ मिनिटांत स्पर्धेची अंतिम रेषा पार केली. द्वितीय क्रमांकाच्या ज्योती भक्त यांनी १ तास २९ मिनिटात सायकल स्पर्धा पुर्ण केली. यावेळी स्पर्धकांना गौरविण्यात आले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!