PUNE REGION POST OFFICE: पुणे टपाल क्षेत्रीय (PUNE REGION POST OFFICE) कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या “दिवाळी फराळ मोहीम 2025” या विशेष उपक्रमात
उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विविध टपाल कर्मचाऱ्यांचा सत्कार
अभिजित बनसोडे संचालक, टपाल सेवा पुणे (PUNE POST OFFICE) यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आला.
दिनांक 22.09.2025 ते 10.11.2025 या काळात राबविण्यात आलेल्या
या मोहिमेत पुणे विभागाने एकूण 2609 आंतरराष्ट्रीय पार्सल्स बुकिंग करत ₹149.87 लाखांचे उत्पन्न एकूण वजन
21,166 किग्रॅ होते, मागील वर्षीपेक्षा उत्पन्नात वाढ 25 टक्के पेक्षा जास्त व पार्सल संख्येमध्ये 40 टक्केपेक्षा जास्त वाढ आहे.
Post Office Dak Coupal : भारतीय डाक विभागाच्या वतीने आयोजित 80वा डाक चौपाल पुण्यात संपन्न
परदेशातील नातेवाईकांना “दिवाळी फराळ” वेगाने व सुरक्षित पोहोचविण्याच्या उद्देशाने व
जगभरातील भारतीयांची दिवाळी गोड करण्यासाठी ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरली.
सर्व विभागांमध्ये, पुणे शहर पूर्व विभागाने
१,४७३ वस्तू आणि ₹९४.२० लाख उत्पन्नासह अव्वल स्थान पटकावले.
पुणे शहर पश्चिम विभागाने ₹३६.०२ लाख उत्पन्नासह दुसरे स्थान पटकावले आणि
पुणे ग्रामीण विभागाने ₹५.६८ लाख उत्पन्नासह तिसरे स्थान पटकावले.
तसेच बारामती, सोलापूर, सातारा, कराड, अहिल्यानगर ,
श्रीरामपूर व पंढरपूर विभागांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमामागील टीमवर्क, ग्राहकाभिमुख सेवा आणि विभागीय समन्वयाचे कौतुक करण्यासाठी
अभिजित बनसोडे संचालक, टपाल सेवा पुणे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या
अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
दिवाळी फराळ मोहीम ही परदेशातील भारतीयांना त्यांच्या संस्कृतीशी जोडणारी सेवा आहे.
प्रत्येक विभागाने दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे ही मोहीम राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरली आहे.
Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दर महिन्याला करा गुंतवणूक; मॅच्युरिटीनंतर होणार लखपती
पुढील काळातही ग्राहककेंद्री उपक्रम अधिक बळकट करण्यासाठी टपाल विभाग कटिबद्ध आहे.
टपाल विभाग नागरिकांना सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह पार्सल सेवा देण्यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवित राहणार आहे.
यावर्षी ग्रामीण भागातूनही आंतर राष्ट्रीय पार्सल बुक झाली, ग्रामीण भागातही आंतराष्ट्रीय सेवेची जागृती झाली आहे.
ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वास व प्रतिसादाबद्दल ग्राहकांचेही आभार मानण्यात आले व वर्षभर पार्सल सेवा व पार्सल पॅकिंग सेवा इतर वस्तूही कपडे,
गिफ्ट व इतर वस्तू व औषधे, खाद्य पदार्थ पाठविन्यासाठी उपलब्ध राहील असे सांगितले. ग्राहकांच्या समाधानाचा हा प्रवास पुढेही वेगाने सुरूच राहील.
असा विश्वास अभिजित बनसोडे संचालक, भारतीय डाक विभाग, पुणे यांनी व्यक्त केला