PUNE PORSCHE CAR ACCIDENT संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारं एक अपघात कांड पुण्यात घडलं. देशातील राजकारण्यांचं आणि मीडियाचं लक्ष त्याकडे लागलं.
या गुन्ह्यापासून ते आरोपीला दिलेल्या शिक्षेपर्यंत प्रत्येकच गोष्ट आश्चर्यचकित करणारी होती. या गुन्ह्यानं पुणेकरांना पुणे पोलिसांना आणि प्रशासनाला खडबडून जागं केलं. PUNE PORSCHE CAR ACCIDENT
ही केस होती “पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण”… आज याच अपघात कांडाला एक वर्ष पूर्ण झालंय. या प्रकरणात एक वर्षात नेमकं काय काय घडलं पाहूया यावरचा स्पेशल रिपोर्ट…18 मे मध्यरात्री दोन वाजण्याची वेळ.. पुण्यातील कल्याणी नगर कोरेगाव पार्क परिसरात पहाटेपर्यंत सुरू असणारे पब, पबच्या बाहेर मद्यधुंद तरुणाई, तेवढ्यात सुसाट वेगात आलेली आलिशान पोर्शे कार.. थेट दोन तरुणांच्या गाडीवर चढली. आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण तरुणीचा बळी गेला. प्रसिद्ध बिल्डरच्या 17 वर्षीय मुलाने गाडी चालवत दोघांचा बळी घेतला. तिथून सुरू झालेली ही केस आता कोणत्या वळणावर आहे, आणि या प्रकरणातील आरोपींचं पुढे काय झालं
TOP NEWS MARATHI | PUNE PORSCHE CAR ACCIDENT प्रकरणाची वर्षभरातील A टू Z स्टोरी
पाहूया की ए टू झेड स्टोरी…
18 मे: मध्यरात्री 2 वाजता पुण्यातील कल्याणीनगर भागात असलेल्या बॉलर पब बाहेर भरधाव वेगातील कारचा अपघात झाला. यखत 2 जणांचा जीव गेला.
18 मे: मध्यरात्री 3 वाजता या अपघातात महागडी गाडी चालवणारा तरुण हा प्रसिद्ध बिल्डरचा अल्पवयीन मुलगा असल्याचं निष्पन्न झालं.
19 मे: पहाटे 4 वाजता येरवडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे दाखल झाले. संपूर्ण प्रकार जाणून घेतला.
19 मे: पहाटे 5 वाजता येरवडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला. आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आलं.
19 मे: दुपारी 3 वाजता तरुण अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळाकडून अटी शर्ती घालून त्याला जामीन मंजूर केला.
20 मे: सकाळी 10 वाजता अल्पवयीन मुलाला आलिशान गाडी चालवायला दिल्याप्रकरणी वडील विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल झाला.
20 मे: ज्या ठिकाणी या अल्पवयीन तरुणाने पार्टी केली त्या पब आणि हॉटेल व्यवस्थापक, मालकावर गुन्हा दाखल झाला.
21 मे: सकाळी 5 वाजता फरार बिल्डर विशाल अगरवालला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली संभाजीनगरमधून अटक केली.
21 मे: दुपारी 3 वाजता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे पोलिसांसोबत पुण्यात बैठक झाली.
21 मे: संध्याकाळी 5 वाजता विशाल अगरवाल याला घेऊन पोलीस पुण्यात दाखल झाले.
Porsche car accident : शिक्षण संस्थांनी प्रवेश नाकारला; अल्पवयीन आरोपीच्या अडचणीत वाढ
21 मे: संध्याकाळी 6 वाजता पुणे पोलिसांनी अल्पवयीन तरुण सज्ञान म्हणून कोर्टाने खटला चालवावा याची केली मागणी केली.
22 मे: दुपारी 12 वाजता अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळात करण्यात हजर आलं.
22 मे: विशाल अगरवाल याला न्यायलयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
22 मे: अल्पवयीन तरुणाची 5 जून पर्यंत बाल सुधारगृहात रवानगी केली.
23 मे: अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांची पुणे पोलिसांनी चौकशी केली.
27 मे: अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर यांना अटक केली.
1 जून: अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल यांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितल्याप्रकरणी अटक केली.
3 जून: रक्ताचे नमुने बदलण्याचा मास्टरमाईंड डॉ अजय तावरे असल्याचं सिद्ध झालं.
4 जून: ससून रुग्णालयातील डॉक्टरांना रक्ताचे नमुने बदलण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक केली.
10 जून: अल्पवयीन आरोपीचा बाल निरीक्षण गृहात आणखी काही दिवस ठेवण्याचा निर्णय झाला.
14 जून: विशाल आणि शिवानी अगरवाल यांच्यासह इतर २ जणांची येरवडा कारागृहात रवानगी केली.
15 जून: अल्पवयीन तरुणाला बाल निरीक्षणगृहातून मुक्त करण्याचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला.
17 जून: पुणे पोलिसांकडून अपघाताचा अहवाल बाल न्याय मंडळाला सादर केला.
25 जून: मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन दिला.
13 जुलै: शिशिर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
11 ऑक्टोबर: अल्पवयीन आरोपीच्या कागदपत्रांची पडताळणी न करता जामीन मंजूर केल्याप्रकरणी बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना बरखास्त करण्यात आलं.
25 ऑक्टोबर: अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉक्टर यांच्यावर खटला सुरू झाला.
5 नोव्हेंबर: विशाल अग्रवालचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला.
5 डिसेंबर: कोर्टाकडून आरोपींची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांना पुन्हा परवानगी मिळाली.
10 फेब्रुवारी 2025: अटक बेकायदेशीर असं म्हणत अल्पवयीन तरुणांच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
20 एप्रिल 2025: ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला.
22 एप्रिल 2025: शिवानी अगरवालची तब्बल 11 महिन्यांनी तुरुंगातून मुक्तता करण्यात आली.
17 मे 2025: पुण्यातील पोर्शे कार अपघात खटला जलदगतीने चालवण्यासंदर्भात पोलिसांनी न्यायालयात पत्र दिलं.
Pune Porshe Car Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ ! कार बनवणाऱ्या कंपनीने केला ‘हा’ मोठा खुलासा
या प्रकरणातील सुनावणी जलदगतीने सुरू करून मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातानंतर पुण्यातील अनेक व्यवस्थांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी स्थिती काही प्रमाणात सुधारलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात पीडितांना न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार