Vishal Agrawal

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल, डॉ. तावरे यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत ‘ही’ माहिती आली समोर

691 0

पुणे : भरधाव पोर्शे कारनं (Pune Porsche Car Accident) दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना पुण्यातील कल्याणीनगर भागात घडली होती. या अपघातामध्ये अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे ही कार प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्याला या प्रकरणात लगेचच जामीन मिळाल्यानं पुणेकरांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. त्यानंतर या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. आता या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत.

डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलले
अपघातानंतर आरोपीला मेडीकल चेकपसाठी रुग्णालयात नेले असताना त्याचे ब्लड सॅम्पल देखील बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात आता एका लोकप्रतिनिधीचं नाव समोर येत आहे. अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी त्या लोकप्रतिनिधीने मदत केली का? याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे

तसेच अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरे हे दोघेही आयफोन वापरतात त्यांना कॉल सीडीआरमध्ये सापडू शकतील याची कल्पना होती, त्यामुळे या दोघांनी व्हाट्सअप कॉलवर संपर्क केल्याचीही माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात विशाल अग्रवाल आणि डॉक्टर तावरे यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण झालं याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!