Vishal Agrawal

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

688 0

पुणे : पुणे कार अपघाता प्रकरणी (Pune Car Accident) पोलिसांनी चालक मुलाचे वडील विशाल अग्रवालला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

कार अपघातातील मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. संपत्तीच्या वादातून भावाविरुद्धच वाद सुरू आहे. यात सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी थेट छोटा राजनकडून मदत घेतल्याचा आरोप आहे.

विशाल अग्रवाल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसंच पुण्यात त्यांची मित्रासह भागीदारी होती. मात्र संपत्तीच्या वादातून मित्रावर गोळीबर झाला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यातही छोटा राजनचा हात असल्याचं सांगितलं जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!