Surendra Agrawal

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

297 0

पुणे : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या (Pune Porsche Accident) संपूर्ण राज्यात गाजताना दिसत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात आहे. तर दुसरीकडे त्याचे वडिल विशाल अग्रवालला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आता याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनादेखील अटक करण्यात आली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
रविवारी (19 मे) रोजी पुण्यात एका 17 वर्षाच्या मुलाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन इंजिनिअर्सना त्याच्या पोर्शे कारने चिरडलं होतं. कार चालवणारा अल्पवयीन दारुच्या नशेत होता. या भीषण रस्ते अपघातात दोन्ही इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. अनिश अवधिया (24 वर्ष) आणि अश्विनी कोष्टा (24 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. हे दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात कामाला होते.

या प्रकरणी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालला 24मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन बाल हक्क न्यायालयाने रद्द केला होता. त्या मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर काल पार पडलेल्या सुनावणीत पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालसह सहा जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News
error: Content is protected !!