Vishal Agrawal

Pune Porsche Accident : बिल्डर विशाल अगरवालच्या अडचणीमध्ये वाढ; काकाचा ‘तो’ कारनामा आला समोर

422 0

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघातामुळे (Pune Porsche Accident) मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेल्या अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोर्शे कार प्रकरणात आरोपी विशाल अगरवाल, त्याची पत्नी, वडील आणि मुलगा आधीच अडचणीत आहेत. अशात आता आरोपी विशाल अगरवालचा काका राम कुमार अगरवाल याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

का दाखल केला गुन्हा?
पुण्यातील बावधन परिसरात असलेल्या नॅन्सी ब्रह्मा या उच्चभ्रू सोसायटीच्या नावावर असलेल्या भूखंडावर 11 मजली टॉवर उभारून सोसायटी धारकांची फसवणूक केल्या प्रकरणी विशाल अगरवाल आणि त्याचे काका राम अगरवालसह अन्य पाच जणांविरुद्ध मोफा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2007 साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रम्हा सोसायटी धारकांची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकी प्रकरणी विशाल सुरेंद्र कुमार अगरवाल, राम कुमार अगरवाल (भाऊ), विनोद कुमार अगरवाल, नंदलाल किमतानी आणि आशिष किमतानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
2007 साली बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रम्हा को.ऑप.हौ.सोसायटी 71 जणांनी फ्लॅट घेतला होता. याच सोसायटीच्या मालकीची तिथे पार्किंग आणि अँमीनीटी स्पेस, मोकळी जागा आहे. परंतु, एकाच ठिकाणची जागा वेगवेगळ्या नकाशावर दर्शवून नकाशात फेरबदल करून तसे नकाशे मंजूर करून नॅन्सी ब्रम्हा सोसायटी सभासदांची कोणतीही परवानगी नसताना बिल्डर विशाल अगरवाल यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून सोसायटीच्या जागेवर 11 मजली इमारतीत 66 कमर्शियल ऑफिस बांधले तर 10 मजली इमारतीत 27 सदनिका आणि 18 शॉप्स बांधून नॅन्सी ब्रम्हा को.ऑप.हौ. सो.ली सोसायटी धारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amol Kale : MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात; 3 जण ठार

Ajit Pawar : राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

Noor Malabika Death : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Suresh Gopi : मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!