पुणे- उत्तमनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार अड्ड्याच्या मालकासह २२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपींकडून २ लाख २६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उत्तमनगर पोलिसांनी केली.
या प्रकरणी जुगार अड्ड्याचे मालक, बाळू सीताराम मराठे (वय ५१ वर्षे) यांच्यासह २१ जणांना अटक करण्यात आली आहे. २ लाख २६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रेस्टिज पब्लिक स्कूल जवळ उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग लॉटमध्ये सुरु होता. याठिकाणी अनधिकृतपणे इलेक्ट्रीक कनेक्शन घेऊन, सुमारे १५ टेबल आणि ७५ खुर्च्या लाऊन या क्लबमध्ये अहोरात्र जुगार सुरू होता. जुगारासाठी लाईट, पंख्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती.