Traffic News

पुणेकरांनो खरेदीसाठी बाहेर पडतात ? थांबा! पोलिसांनी बाजारपेठांकडे जाणाऱ्या वाहतुकीत केले ‘हे’ मोठे बदल

78 0

वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी अगदी आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने पुणेकर आणि बाहेरचे नागरिक आहे पुण्यात येत आहेत. ज्यामुळे पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. हीच गर्दी टाळण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

पुण्यातील मध्यवर्ती रस्त्यांवरून होणाऱ्या वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी पाच नोव्हेंबर पर्यंत चार चाकी वाहनांना शिवाजी रस्त्याने जाण्यास निर्बंध घातले आहेत. याबाबतची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

बदल खालील प्रमाणे

स्वारगेटवरुन बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे पुरम चौकमार्गे जाणाऱ्या चार चाकी वाहनांची वाहतूक वळवून पुरम चौकामधून डावीकडे वळून टिळक रोडने एस पी कॉलेज, अलका चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

शिवाजीनगरवरुन शिवाजी रोडने जाणारी चारचाकी वाहने स. गो. बर्वे चौकामधून वळविण्यात आली असून त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून जंगली महाराज रोडने, टिळक चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.

शनिपार चौकाकडून मंडईकडे जाणारी वाहतूक व कुमठेकर रस्त्याने मंडईकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. तरी या मार्गासाठी पर्यायी मार्ग म्हणून बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाता येईल.

फुटका बरुजवरुन जोगेश्वरी चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. या मार्गावरची वाहतूक शिवाजी रस्त्याने वळवण्यात आली आहे.

अतिशय रहदारी असलेल्या अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. तर त्या ऐवजी पर्यायी मार्ग म्हणून बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाता येईल.

वाहतुकीबरोबरच पार्किंगच्या जागेमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.‌ पार्किंगचे बदल खालील प्रमाणे

शिवाजी रोड, मंडई, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड या भागामध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी येणार्‍या नागरिकांनी त्यांची वाहने बाबु गेनू पार्किंग, मिसाळ पार्किंग, हमालवाडा पार्किंग व साने वाहनतळ या ठिकाणी पार्क करावीत.

Share This News
error: Content is protected !!