PUNE NEWS: व्हिडिओ कॉल… फोटो व्हायरल… 2 तरुणांच्या आत्महत्या! पुण्यात सेक्सटॉर्शनचा काळा खेळ

375 0

PUNE NEWS 2 दिवस… 2 आत्महत्या… आणि कारण एकच – सेक्सटॉर्शन…पुण्यात दोन युवकांनी वेगवेगळ्या दिवशी आत्महत्या केली PUNE NEWS

PUNE NEWS: विद्येच्या माहेरघरात सेक्सटॉर्शनचा काळा खेळ

आणि दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी सेक्सटॉर्शनचा धक्कादायक पर्दाफाश केला आहे…

पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे??दत्तवाडी येथील 19 वर्षीय मुलाने 28 सप्टेंबर 2022 मध्ये आत्महत्या केली..

आत्महत्येनंतर मुलाच्या बहिणीने सांगितलं… या तरुणाने आत्महत्या करण्याच्या काही दिवस..त्याच्या बहिणीच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरुन हॅलो असा मेसेज आला

तसंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो आला होता… या फोटोत तिचा भाऊ नग्न अवस्थेत बसला आहे हे दिसत होतं…

युवकाच्या बहिणीने तो फोटो पाहिला आहे याची खात्री पटल्यानंतर अनोळखी सेंडरने तो फोटो डिलिट केला…

त्यानंतर मुलीच्या बहिणीला एका मुलीचा फोन आला. मी तुझ्या भावाची मैत्रीण बोलत असल्याचं त्या मुलीने सांगितलं.

NANA PATOLE: झुडपी जंगलाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील अनेक कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका!

कुणीतरी तुझ्या भावाला ब्लॅकमेल करतं आहे. यानंतर बहिणीने भावाला फोन करण्याचा प्रयत्न केला…

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भाऊ घरी आला आहे का? हे पाहण्यासाठी ती घरी आल्यानंतर तिने भावाला मृतावस्थेत पाहिलं. त्यानंतर भावाने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या बहिणीने पोलिसांना दिली.या प्रकरणी तपास केल्यानंतर पोलिसांना समजलं की या मुलाशी प्रीती नाव धारण करुन महिला चॅटिंग करत होती. त्याला आपल्या जाळ्यात ओढून तिने या मुलाचे नग्न फोटो आणि व्हिडीओ मिळवले.

RATION SHOP NEWS: रास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्ये

त्यानंतर तू जर पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. यानंतर या मुलाने ब्लॅकमेलरला तीनवेळा प्रत्येकी 4 हजार 500 रुपये फोनवरील पेमेंट अॅपवरुन दिले. त्यानंतरही या मुलाचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. ज्यानंतर या मुलाने आत्महत्या केली..

DR.SHIRISH WALSANGKAR:प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

या प्रकरणाची तांत्रिक बाजू आणि पेमेंट मिळवण्यासाठी वापरलेली पद्धत हे सगळं पाहिल्यानंतर पोलिसांना समजलं की या प्रकरणात राजस्थानातील गोथ्री गुरु गावातील एक 29 वर्षीय माणूस आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांनी या तरुणाला अटक केली.

Share This News
error: Content is protected !!